पानमसाल्यासह गुटखा बंदी कायम हायकोर्टाचा स्थगितीला नकार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पानमसाल्यासह गुटखा बंदी कायम हायकोर्टाचा स्थगितीला नकार

Share This



पानमसाल्यासह गुटखा बंदी कायम हायकोर्टाचा स्थगितीला नकार 

मुंबई- गुटखा आणि इतर गुटखाजन्य उत्पादनांवरील बंदी उठवणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितावह नसल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने शुक्रवारी गुटखा व पानमसाल्यावरील बंदी कायम ठेवली.

राज्य सरकारने लागू केलेल्या बंदीविरोधात बड्या गुटखा उत्पादकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवर सरसकट बंदी घालण्याऐवजी किमान पानमसाल्यावरील तरी बंदी उठवावी, अशी उत्पादकांची मागणी होती. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी गुटख्यामध्ये मॅग्नेशियम काबरेनेट, झिंक आणि निकोटिनसारखे शरीराला अपायकारक ठरणारे पदार्थ असल्यामुळे त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, पानमसाल्यात मात्र झिंकची मात्रा अतिशय कमी प्रमाणात असते. त्यामुळे त्याच्यावरील बंदी उठवावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड. रवी कदम यांनी केली. तसेच, सरकारने केवळ गुटखा आणि गुटखाजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पानमसाल्याचा यात समावेश होत नाही, असा युक्तिवादही त्यांच्यातर्फे करण्यात आला. परंतु, पानमसाल्यातदेखील मॅग्नेशियम काबरेनेटसारख्या घातक पदार्थांचे प्रमाण असल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये निदर्शनास आल्याच्या बाबीकडे राज्याचे अँडव्होकेट जनरल दरायस खंबाटा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर राज्य सरकारने लागू केलेल्या गुटखाबंदीचे सर्मथन करत न्यायालयाने ही बंदी व्यापक सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे ही बंदी उठवण्याचे आदेश राज्य सरकारला देणार नसल्याचेही स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages