तिन्ही रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2012

तिन्ही रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक

तिन्ही रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइन आणि हार्बर मार्गावर रविवार, 9 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला ते मस्जिद बंदरदरम्यान अप मार्गावर, तर वडाळा रोड ते माहिम स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याणदरम्यानची डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांमध्ये लोकल गाडय़ा थांबणार नाहीत. हार्बर मार्गावर कुर्ला ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान अप मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे अप मार्गावरील सर्व लोकल कुर्ला स्थानकांहून सीएसटीपर्यंत मेन लाइनवरून चालवण्यात येणार आहेत. दरम्यान, या लोकल चिंचपोकळी, करीरोड स्थानकांवर थांबणार नाहीत. सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप अणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 4.04 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सीएसटी ते वांद्रे-अंधेरी हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करू शकतात.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS