मुंबई मध्ये टीटीएफ पर्यटन महोत्सव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2012

मुंबई मध्ये टीटीएफ पर्यटन महोत्सव

मुंबई मध्ये टीटीएफ पर्यटन महोत्सव


सुट्टीसाठी सज्ज झालेल्या मुंबईकरांनी आपल्या सहलीचे नियोजन करण्यासंदर्भात भारताच्या सर्वात मोठय़ा पर्यटनविषयक 'ट्रॅव्हल अँण्ड टुरिझम फेअर (टीटीएफ)' या प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन 7 ते 9 सप्टेंबर या कालावधीत नेहरू सेंटर येथे भरविण्यात आले आहे. 1989 पासून टीटीएफ हे सहल आणि पर्यटन उद्योगातील भारताचे अग्रणी प्रदर्शन म्हणून ओळखले जाते. देश-विदेशातील पर्यटन संस्थांना आपल्या सेवा आणि उत्पादने सादर करण्याची वार्षिक संधी टीटीएफच्या वतीने दिली जाते. टीटीएफ मुंबई-212 दिवाळी आवृत्तीमध्ये राष्ट्रीय/प्रादेशिक पर्यटन संस्था, राज्य सरकारचा पर्यटन विभाग, सहल आयोजक, पर्यटन प्रतिनिधी, हॉटेल्स, रिसॉर्ट, साहसी पर्यटन, भाडेतत्त्वावरील कार, रेल्वे, कोज ऑपरेटर अशा 150 पेक्षाही अधिक संस्था सहभागी झाल्या आहेत.

आगामी उत्सवाचा आणि सुट्टीचा काळ पाहून टीटीएफ टुरिझममध्ये सहभागी झालेल्या संस्थांनी पर्यटन व्यापार आणि ग्राहक विपणन कार्यक्रम सादर केले. टीटीएफच्या वतीने मुंबईकरांना एकाच ठिकाणी त्यांच्या सुट्टीतील सहलींचे नियोजन करण्याची आणि पर्यटनस्थळ निवडण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले असून त्यामधून त्यांना व्यक्तिश: आवडणार्‍या स्थळांच्या सहलीचे त्यांना परवडेल अशा दरामध्ये नियोजन करता येणार आहे. त्याव्यतिरिक्त शेकडो पर्यटनस्थळांची माहिती, पॅकेज आणि अनेक पर्याय टीटीएफला भेट देणार्‍या लोकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वोत्तम पर्याय आणि पॅकेज या ठिकाणी मिळतात.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला जाणारा टीटीएफचा उन्हाळीपूर्व पर्यटन महोत्सव हा आशियामधील सर्वात मोठा पर्यटन महोत्सव म्हणून ओळखला जातो. मागील वर्षापासून दिवाळी आवृत्तीची सुरुवात करण्यात आली. मोकळा वेळ असणार्‍या पर्यटनप्रेमींसाठी आता राहिलेल्या वर्षामध्ये त्यांच्या सहलीचे नियोजन करण्याची संधी मिळणार आहे. 600 लाख देशांतर्गत पर्यटन सहलींचे आयोजन करून देशांतर्गत सहली या भारतीय पर्यटन उद्योगाचा महत्त्वाचा कणा बनला आहे. परदेश पर्यटनाच्या संख्येमध्ये देखील वार्षिक 15 टक्के वाढत असून जवळपास 12 लाख भारतीय नागरिकांनी मागील वर्षी परदेश पर्यटन केले आहे. त्या तुलनेत देशांतर्गत पर्यटनामध्ये मागील वर्षी 6.8 लाखांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये वार्षिक 6.6 टक्के वाढ होत आहे. भारतामधील पर्यटन उद्योग हा सर्वात मोठा सेवा उद्योग आहे. राष्ट्रीय जीडीपीमध्ये या उद्योगाचा 6.23 टक्के सहभाग होतो आणि भारतातील एकूण रोजगाराच्या 8.78 टक्के रोजगार या उद्योगामध्ये आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ आदी भारतामधील राज्ये ही पर्यटनावर अवलंबून असतात. टीटीएफचे आयोजक फेअरफेस्ट मीडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अगरवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे 'टीटीएफ'सारखे व्यासपीठ म्हणजे पर्यटन उद्योगाला चालना देणारे आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS