दर्डावर चौकशीनंतर कारवाई - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2012

दर्डावर चौकशीनंतर कारवाई - मुख्यमंत्री

दर्डावर चौकशीनंतर कारवाई - मुख्यमंत्री
कोळसा घोटाळ्यात राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे सीबीआय चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल, असे शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंर्त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोळसा घोटाळ्यात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंर्त्यांना केला. यावर मुख्यमंत्री म्हणाले, भ्रष्टाचाराबाबत आमचे सरकार अतिशय गंभीर आहे. दर्डा यांची सीबीआय चौकशी सुरू असून या चौकशीचा अहवाल दर्डाविरुद्ध आला तर आम्ही त्यांच्यावर निश्चितच कारवाई करू. राज्य पातळीवरही आम्ही या संदर्भात माहिती मागवली असल्याचे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. राज ठाकरे यांच्यावरही कारवाई करणार का, यावर मुख्यमंर्त्यांनी कायदा मोडणार्‍या प्रत्येकावर आम्ही कारवाई करू, असे म्हटले. अमरावती विभागातील भीषण स्थिती पाहता आम्ही केंद्र शासनाकडे 2022 कोटी रुपयांची मागणी या विभागासाठी केली आहे. विदर्भात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणार्‍या विविध समस्यांवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी दोन हजार कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS