घाटकोपर : वृद्धेची हत्या प्रकरण / मसाज करणार्‍या महिलेचे रेखाचित्र जारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2012

घाटकोपर : वृद्धेची हत्या प्रकरण / मसाज करणार्‍या महिलेचे रेखाचित्र जारी



घाटकोपर : वृद्धेची हत्या प्रकरण
मसाज करणार्‍या महिलेचे रेखाचित्र जारी
मुंबई / अजेयकुमार जाधव 
घाटकोपर येथील वृद्धेवर सपासप वार करून घरातील 15 लाखांचे दागिने चोरल्याच्या धक्कादायक प्रकरणी पंतनगर पोलीस मृत वद्धेकडे मसाजसाठी येणार्‍या महिलेचा शोध घेत आहेत. या संशयित महिलेची ओळख पटवण्यासाठी तिचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. 

घाटकोपर (पू.), गारोडिया नगरातील श्री कृष्ण आशिष बिल्डिंग 4था मजला, रूम नं. 8 या ठिकाणी सतीश फत्तेचंद दप्तरी (69) व त्यांच्या पत्नी दक्षा (62) हे वृद्ध दांपत्य राहत होते. त्यांचा एक मुलगा परदेशात, तर दोन्ही मुली लग्नानंतर ताडदेव आणि विद्याविहार अशा ठिकाणी राहतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सतीश दप्तरी आपल्या घाटकोपर इण्डस्ट्रीयल इस्टेट येथील कारखान्यात गेल्यानंतर दक्षा एकटय़ाच घरा राहत होत्या. आठवडाभरापासून त्यांनी मसाज व धुणीभांडी करण्यासाठी अनिता नावाच्या महिलेला कामावर ठेवले होते. 

अनिता ही दररोज दुपारी 12 वाजता दक्षा यांच्या घरी येऊन धुणीभांडी व मसाज करून जात असे. शुक्रवारी दुपारी दक्षा यांना विद्याविहार येथे राहणार्‍या त्यांच्या मुलीने व त्यांच्या पतीनेही फोन केले; परंतु त्यांच्या फोनला प्रतिसाद मिळाला नाही. सतीश हे रात्री साडेसात वाजता घरी आले असता दक्षा या रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे दृश्य त्यांनी पाहिले. मारेकर्‍यांनी दक्षा यांच्यावर धारदार चाकूने अनेक वार करून त्यांच्या अंगावरील तसेच घरातील हिरेजडित सोन्याचे दागिने असा एकूण 15 लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केल्याचे उघड झाले. 

या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी इमारतीच्या वॉचमन व शेजार्‍यांकडे चौकशी केली असता बाहेरून कुठलीही अनोळखी व्यक्ती इमारतीत आली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र दक्षा यांच्या घरी मागील काही दिवसांपासून दक्षा यांच्या पायाचा मसाज करण्यासाठी 40 वर्षीय महिला दररोज येत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून दक्षा यांच्या घरी मसाज करण्यासाठी येणार्‍या अनिता या महिलेविरुद्ध हत्या व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS