रझा अकादमीकडून नुकसानभरपाई वसूल करा उच्च न्यायालयात याचिका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2012

रझा अकादमीकडून नुकसानभरपाई वसूल करा उच्च न्यायालयात याचिका

मुंबई :आझाद मैदान व सीएसटी परिसरात उसळलेल्या दंगलीमुळे झालेल्या सार्वजनिक मालमत्तेची नुकसानभरपाई रझा अकादमी व अन्य संबंधित संघटनांकडून वसूल करण्याचा आदेश द्या, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालात दाखल करण्यात आली आहे.

देशभक्त पत्रकार संघटनेचे डॉ. उदय जोशी व संकेत सातोपे या दोघा पत्रकारांच्या वतीने अँड. संजीव पुनाळेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी होण्याची शक्यता आहे.आसाम व म्यानमारमधील मुस्लीम धर्मीयांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रजा अकादमी व अन्य काही मुस्लीम संघटनांनी 11 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. या मोर्चातील जमाव हिंसक झाला आणि त्यांनी बेस्ट बस, पोलिसांची वाहने, खाजगी टीव्ही चॅनेल्सच्या ओबी व्हॅनची तोडफोड केली. महिला पोलिसांशी असभ्य वर्तन केले तसेच पालिका मुख्यालयासमोरील 'अमर जवान' स्मारकाची तोडफोड केली. राज्य सरकारने या प्रकरणी केवळ 53 जणांना अटक केली, मात्र सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानभरपाईची वसुली करण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही. उलट या मोर्चाच्या आयोजकांबाबत राज्य सरकारने मवाळ धोरण अवलंबले आहे. ही दंगल घडवून आणणार्‍यांच्या हितासाठी सरकार काम करत असल्यामुळे कायदा पाळणार्‍या नागरिकांचा सरकारी यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे , असा आरोप करून रझा अकादमीच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई आणि नुकसानभरपाई वसूल करण्याचा आदेश द्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण होऊ शकेल, असे या याचिकेत नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS