मुंबई : सोनसाखळी चोर्यांबरोबरच घरफोडीच्या घटनांनी मुंबई शहरात उच्चंक मोडला आहे. गणेशोत्सवाच्या पूजेला गेलेल्या कुटुंबाच्या घरात दिवसाढवळय़ा घुसून चोरटय़ांनी घरातील 5 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना घाटकोपर येथे रविवारी घडली असून पंतनगर पोलीस चोरटय़ांचा शोध घेत आहेत. घाटकोपर (पू.), एफ-1/7 बेस्ट वसाहत या ठिकाणी पांडुरंग बबन जोरी (50) हे आपल्या कुटुंबासह राहतात. रविवारी दुपारी 12 या दरम्यान जोरी कुटुंबीय साकीनाका येथे गणेशपूजेला गेले होते. ते सायंकाळी 4 वाजता परतले असता त्यांच्या घरातील कपाट उघडे व इतर साहित्य विखुरलेले दिसले. गॅलरीचा दरवाजा उघडा दिसला. जोरी यांनी घराची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व 500 रुपये रोख असा 5 लाख 14 हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले.
Post Top Ad
27 September 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment