रस्त्यांच्या बांधकामात आंतरराष्ट्रीय कंपन्यांना सहभागी करावे - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2012

रस्त्यांच्या बांधकामात आंतरराष्ट्रीय कंपन्यांना सहभागी करावे - महापौर

मुंबई : मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या कंपन्यांशी चर्चा करून मुंबईतील रस्त्यांच्या बांधकामांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यावे, असे महापौर सुनील प्रभू यांनी बुधवारी सांगितले.

महापौर सुनील प्रभू यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी, एल अँण्ड टी, गॅमन इंडिया, जे. कुमार या कंपन्यांसोबत महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी प्राथमिक स्वरूपात चर्चा करून मुंबई पालिकेसोबत काम करण्याबाबत त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच चर्चेतून मार्ग काढून रस्त्याच्या बांधकामाच्या कामांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यावे, असे महापौरांनी सांगितले. आगामी काळात 1400 कोटी रुपयांचे रस्त्यांचे बांधकाम प्रस्तावित असून या कंपन्यांना सहभाग पालिकेला मिळाल्यास मुंबईतील सी.सी. आणि अस्फाल्ट रस्त्याचा दर्जा चांगला होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल महापालिका प्रशासनाने करावी, असे विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS