मयांक गांधी यांनी बुडवले 120 कोटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2012

मयांक गांधी यांनी बुडवले 120 कोटी

मुंबई : 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'चे मुंबई अध्यक्ष मयांक गांधी हे स्वत: भ्रष्टाचारात बरबटले असून त्यांनी 'स्टॅम्प डय़ुटी'च्या माध्यमातून 120 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप 'फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष वीरेन शहा यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांनाही लक्ष्य केले. केजरीवाल यांनी अण्णा हजारेंच्या नावाने गोळा केलेले अडीज कोटी रुपये संबंधित देणगीदारांना परत करावेत, अशी मागणी शहा यांनी केली. 

त्यांनी सांगितले की, मयांक गांधी यांनी चिरा बाजार येथे 30 एकर जमिनीचा पुनर्विकास करण्यासाठी स्वत:च्या सामाजिक संस्थेचा वापर करत सरकारकडे प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव आजही सरकारकडे आहे. प्रस्तावानंतर त्यांनी 120 कोटींची स्टॅम्प डय़ुटी भरणे आवश्यक होते, मात्र ती रक्कम त्यांनी अद्याप सरकारकडे भरणा केलेली नाही. संबंधित प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसल्याचे सांगितले जाते.; पण ते खोटे असल्याचा दावा शहा यांनी या वेळी केला. मयांक गांधी यांनी आपल्या चुलत्याच्या कंपनीला कोटय़वधी रुपये मिळवून दिले. या माध्यमातून त्यांनी सरकार आणि रहिवाशांची फसवणूक केली. 

त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचाही विश्वासघात केल्याचे शहा यांनी सांगितले. दुसरीकडे अंजली दमनिया यांनी शेतीची जमीन 'व्यावसायिक' वापरासाठी उपलब्ध केली. त्यातही मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. या सर्व भ्रष्टाचारांच्या चौकशीसाठी आपण मुख्यमंर्त्यांशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS