बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर देवनार पशुवधगृहाला गृहमंर्त्यांची भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2012

बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर देवनार पशुवधगृहाला गृहमंर्त्यांची भेट

मुंबई : बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर देवनार पशुवधगृहाला मंगळवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी पोलिसांसह महापालिका अधिकार्‍यांशी चर्चा करून आढावा घेतला.या वेळी खासदार संजय पाटील, पोलीस सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) सदानंद दाते, अप्पर पोलीस आयुक्त कैसर खालीद, उपायुक्त लखमी गौतम, महापालिका उपायुक्त खैरे, देठे आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल खैरे यांनी तर अप्पर पोलीस आयुक्तांनी सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. गृहमंत्री पाटील यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व्यापारी आणि सामान्य नागरिकांना देवनार पशुवधगृहाच्या परिसरात येऊन त्रास देतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर शांतता टिकवून ठेवण्याचे आवाहनही केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS