बेस्ट कामगारांचा संघर्ष पेटणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2012

बेस्ट कामगारांचा संघर्ष पेटणार

मुंबई : बेस्ट उपक्रमास कर्जाची गरज आहे म्हणून पालिकेकडून 12 टक्के व्याज दाराने कर्ज घेण्याचा ठराव बेस्ट समितीने मंजूर करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. खरे पाहता बेस्टकडे असणारा रिझर्व्ह फंड, गंगाजळी व विविध फंडांच्या गुंतवणुकीच्या रकमेचे विवरण जनतेला का दिले जात नाही? असा सवाल करत बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व मुंबई इलेक्ट्रिक ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी आता बोनस (सानुग्रह अनुदान) व अधिकार्‍यांच्या वेतनाच्या कराराप्रश्नी बेस्टमध्ये संघर्ष पेटणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

वीज ग्राहकांकडून अनामत घेतलेली कोटय़वधींची रक्कमही जनतेसमोर ठेवण्यात आली नाही. 50 वर्षापासून बेस्टच्या तोटय़ाची कारणे सांगितली जात नाहीत. वेतनवाढीचा व सोयीसवलतीचा करार 10 वर्षाचा केला जातो. सहा महिने झाले तरी अद्यापि थकबाकी मिळाली नाही. 1 एपिल्र 2006 पासून वेतनवाढीचा करार केला नाही. त्यामुळे अधिकारी व कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. 2011-12 साठी 20 टक्के दराने बोनस (सानुग्रह अनुदान) रकमेची मागणी केल्यामुळेच कर्जाचे ढोंग केले आहे, असे गायकवाड म्हणाले. या पाश्र्वभूमीवर 31 ऑक्टोबरला 6.30 वाजता करिश्मा बिल्डिंग दादर (पूर्व) येथे सभेचे आयोजन केले आहे. त्या वेळी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS