आरटीओच्या तपासणी मोहिमेत 1600 रिक्षा तर 538 टॅक्सी दोषी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2012

आरटीओच्या तपासणी मोहिमेत 1600 रिक्षा तर 538 टॅक्सी दोषी


एपिल्र ते सप्टेंबर दरम्यान 4850 रिक्षांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1600 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे, तर याच काळात 1062 टॅक्सींची तपासणी करण्यात आली असून 538 टॅक्सींवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील रिक्षा-टॅक्सीवाल्यांनी प्रवाशांना भाडे नाकारले, उद्धट वर्तन केले तर त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी परिवहन विभागाने टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. 1800220110 या क्रमांकावर प्रवासी आपली तक्रार नोंदवू शकतो. आपल्या तक्रारीमध्ये प्रवाशाला त्या रिक्षा किंवा टॅक्सीचा गाडी क्रमांक, वेळ, काळ, स्थळ सांगावे लागते. तसेच आरटीओच्या फ्लाईंग स्वॉडद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत एपिल्र ते सप्टेंबर 2012 दरम्यान 4850 रिक्षांची तर 1062 टॅक्सींची तपासणी करण्यात आली आहे. रिक्षाच्या तपासणीमध्ये एकूण 12 लाख 11 हजार 100 रुपये, तर टॅक्सीच्या तपासणीमध्ये 4 लाख 14 हजार 450 रुपये दंड आकारण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS