| मुंबई : बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी मनपा प्रशासनाकडून कर्ज घेण्याच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. बेस्ट उपक्रमाने कर्ज घेतले नाही तर कारभार करणे कठीण होईल, असे गुप्ता यांनी सांगितले आहे. बेस्ट उपक्रमास 1 हजार 600 कोटी रुपये कर्जरूपाने देण्यास मनपा प्रशासन तयार झाले आहे. सामान्यपणे कोणत्याही प्रस्तावाची माहिती तीन दिवस अगोदर देण्यात येते, मात्र कर्ज घेण्याचा प्रस्ताव एक दिवसअगोदर बेस्ट समितीमध्ये पाठवण्याचा सदस्य रवि राजा यांनी विरोध केला होता. येत्या सोमवारी समिती कर्जाच्या मुद्दय़ावर निर्णय घेणार आहे. बेस्ट उपक्रम जवळपास 3 हजार कोटी रुपयांच्या तोटय़ात आहे. यापैकी 1 हजार 900 कोटी व्याजाच्या रूपात आहेत,तर उर्वरित रक्कम मनपा प्रशासनाकडून 5 टक्के व्याजावर कर्जाच्या स्वरूपात घेतले आहेत.मनपाकडून कर्ज घेण्यासाठी शुक्रवारी बेस्ट समितीमध्ये यासंबंधीचा प्रस्ताव आला. महाव्यवस्थापक गुप्ता यांनी केंद्र सरकार आणि आरबीआयद्वारे कर्ज घेण्यास मनाई केल्यामुळे मनपाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. तोटय़ात असलेला बेस्ट उपक्रम कर्जाच्या बळावरच कर्मचार्यांचे वेतन देत आहे. कर्ज मिळण्यास अडचण निर्माण झाल्यास कर्मचार्यांना दिवाळीचा बोनस देणे ही कठीण होईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच बेस्टला कर्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी 48 कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. बँकांतून कर्ज घेतल्यास बेस्टला 13 ते 16 टक्के व्याज द्यावे लागते. आता व्याजापोटी देण्यात येणारी रक्कम वाचणार असल्यामुळे त्याचा बेस्टला फायदा होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. |
Post Top Ad
20 October 2012
Home
Unlabelled
बेस्टचा गाडा हाकण्यासाठी कर्ज आवश्यक - ओ. पी. गुप्ता
बेस्टचा गाडा हाकण्यासाठी कर्ज आवश्यक - ओ. पी. गुप्ता
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment