रत्नाकर गायकवाड यांना एमएमआरडीएकडून नोटीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2012

रत्नाकर गायकवाड यांना एमएमआरडीएकडून नोटीस


मुंबई : माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी मुख्य सचिव कार्यकालात वापरलेल्या सुविधांचे एक लाखाहून अधिक रुपयांचे देयक आकारण्यात आले असून त्याच्या वसुलीसाठी 

एमएमआरडीएकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. यानंतर गायकवाडांनी प्राधिकरणास 15236 रुपये रक्कम अदा केली असून उर्वरित रक्कम ही त्या पदावरील सुविधेअंतर्गत देण्यात आल्याची माहिती आयोग विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त म्हणून रत्नाकर गायकवाड जेतवन या इमारतीतील पेंटा हाऊसमध्ये राहत होते. त्यातच मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरही ते जेतवन या प्राधिकरणातील अधिकार्‍यांच्या वसाहतींतच राहत होते. भाडेरहित निवासस्थान देण्याचे स्पष्ट आदेश असतानाही एमएमआरडीए प्रशासनाने त्यांच्यावर लाखो रुपयांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याची तक्रार अनिल गलगली यांनी लेखी स्वरुपात मुख्यमंर्त्यांना सादर केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एमएमआरडीएने 22 ऑगस्ट रोजी 133232 रुपये इतक्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्याचे निर्देश जारी केले. रत्नाकर गायवाड यांनी दूरध्वनी बिलापोटी 15536 रुपये अदा केले आहेत. मात्र उर्वरित देयक हे प्राधिकरणाच्या कल्याणकारी समितीचे अध्यक्ष म्हणून सुविधांच्या स्वरूपात दिल्याने देयक भरण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे राज्य मुख्य माहिती आयुक्तांच्या पत्रव्यवहारात स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS