गॅसधारकांना सवलतीच्या दरात लवकरच आणखी 3 सिलिंडर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2012

गॅसधारकांना सवलतीच्या दरात लवकरच आणखी 3 सिलिंडर


मुंबई : राज्यातील गॅसधारकांना सवलतीच्या दराने आणखी तीन गॅस सिलिंडर देण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशातील मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत ही मागणी केल्याने सवलतीच्या तीन सिलिंडरचे श्रेय घेण्याची सर्व औपचारिकता झाल्याने राज्य शासन येत्या बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची औपचारिक घोषणा करतील, असे माहीतगारांनी सांगितले. 

मंत्रिमंडळाच्या मागच्या बैठकीतच यावर चर्चा झाली. निर्णयही झाला; पण नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे आता तो लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवे तर आमदार-खासदारांना, सनदी अधिकार्‍यांना या सवलतीतून वगळा; पण सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणखी तीन सिलिंडर सवलतीच्या दरात द्या, अशी मागणी आपण मुख्यमंर्त्यांकडे केली असल्याचे माणिकरावांनी सांगितले. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक विचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोयाबीनला 3200 रुपयांचा भाव द्यावा, तसेच सोयाबीन आणि कापसाची नाफेडने ताबडतोब खरेदी सुरू करावी, अशी मागणीही आपण मुख्यमंर्त्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS