शूद्राला सिनेमागृह उपलब्ध न करणाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2012

शूद्राला सिनेमागृह उपलब्ध न करणाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करणार


P1040550.JPG
मुंबई / अजेयकुमार  जाधव 
JADHAV PRESS NETWORK  /   NEWS website:- http://jpnnews.webs.com
शुद्र हा चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असून हा चित्रपट दलितांचे वास्तव चित्र या चित्रपटाद्वारे प्रदर्शित होणार असल्याने चित्रपटगृह मालकांनी चित्रपट चालवण्यास नकार दिला आहे. असा नकार देणाऱ्या चित्रपटगृह मालकांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करणार असल्याचे चित्रपटाचे क्रिएटीव हेड संदीप जाधव यांनी सांगितले.
आरपीआय चे रामदास आठवले यांच्यासह गृहमंत्री आर आर पाटील यांची भेट घेवूनही चित्रपट गृह मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली असता गृहमंत्र्यांनी चित्रपटगृह देण्याचे आदेश थिएतर मालक असोसिएशन ला दिले. तसेच चित्रपट गृहाला संरक्षण देणाचे आश्वासन दिले. परंतु तरीही चित्रपटगृह न मिळाल्याने आरपीआय च्या वतीने तीव्र आंदोलन करणार असून चित्रपटाला संरक्षण देणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. हा चित्रपट त्या काळावर आधारित असून या मुले कोणाचीही भावना दुकःवण्याचा मानस चित्रपट निर्मात्यांचा नसल्याचे आठवले यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS