कांदिवलीत आयटकचे 40वे राष्ट्रीय अधिवेशन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2012

कांदिवलीत आयटकचे 40वे राष्ट्रीय अधिवेशन

मुंबई : सत्ताधारी व विरोधक यांच्या संगनमताने सुरू असलेले हे सरकार गोरगरीब जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. रोज नवे घोटाळे बाहेर येत आहेत. अशा या भांडवलदारी सरकारवर प्रतिहल्ला करण्यासाठी आयटकने कंबर कसली असून देशव्यापी आंदोलन उभे केले आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबईत कांदिवली येथे आयटकचे 40वे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्या वेळी सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले जाईल, अशी माहिती आयटकचे राष्ट्रीय महासचिव खा. गुरुदास गुप्ता यांनी येथे बुधवारी दिली. 

27 ते 30 नोव्हेंबर रोजी कांदिवली पश्चिम येथे आयटकचे 40वे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. कामगार, शेतमजूर, महागाई, शिक्षण, मोलकरीण, बेरोजगार आदी घटकांतील जनता या सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. महागाई गगनाला भिडली आहे. मुंबईत अंबानीचा महाल अका बाजूला व झोपडपट्टीतील जनतेला पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते, असे चित्र या आंतरराष्ट्रीय शहरात पाहावयास मिळते. ही विषमता कधी दूर होणार? असा सवालही गुप्ता यांनी या वेळी केला. 20 व 21 फेब्रुवारी 2013 ला 11 केंद्रीय कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आहे. 18 व 19 डिसेंबर 2012 ला कायदेभंग करून 20 डिसेंबरला लोकसभेवर मोर्चा घेऊन जाणार असल्याचे गुप्ता यांनी या वेळी सांगितले. या वेळी विश्वास उटगी, कॉ. सुकुमार दामले, कॉ. नारायण घागरे, वीज कामगारांचे प्रमुख कॉ. शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS