विद्यार्थ्यांना फक्त सुगंधी दूध देण्याची योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2012

विद्यार्थ्यांना फक्त सुगंधी दूध देण्याची योजना


मुंबई - विद्यार्थ्यांना फक्त सुगंधी दूध देण्याची योजना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर कोणतेही खाद्यपदार्थ देता येणार नाहीत. तसेच दुधाचे वितरण पालकांशी चर्चा करून करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी स्पष्ट केले आहे. 

गेल्या आठवड्यात मालवणीतील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना दुधाची बाधा झाल्यानंतर दूध पचवू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पौष्टिक थ्रेप्टिन बिस्किटे देण्याचा प्रस्ताव असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले होते. मात्र थ्रेप्टिन बिस्किटे देण्याचा विचार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त अडताणी यांनी स्पष्ट केले. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दूध देण्याची योजना असून त्यासाठीच अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. याऐवजी इतर खाद्यपदार्थ द्यायचे असल्यास त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद असणे गरजेचे आहे. मात्र या आर्थिक वर्षात हे शक्‍य नसल्याने पालिकेकडे फक्त दुधाचा पर्याय आहे. 

या वर्षी विद्यार्थ्यांना दोन वेळा दुधाची बाधा झाल्यामुळे सावध पावले उचलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मालवणी येथील दूधबाधेच्या प्रकारानंतर दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच पालकांशी चर्चा करून दूध वितरणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र दुधाला पर्याय देता येत नसल्याचे अडताणी यांनी स्पष्ट केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS