आकाशगंगेत सापडला 8.40 कोटी तार्‍यांचा समूह - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2012

आकाशगंगेत सापडला 8.40 कोटी तार्‍यांचा समूह



वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी चिलीतील एका विशाल दुर्बिणीच्या मदतीने सुमारे 8.40 कोटी तार्‍यांचा एक पुंजका आपल्या आकाशगंगेत शोधून काढला आहे. या दुर्बिणीद्वारे घेण्यात आलेली आकाशगंगेची ही छायाचित्रे आतापर्यंतची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे असून त्यामध्ये तार्‍यांचे विशाल जाळे अतिशय स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या तार्‍यांचे आतापर्यंतचे हे सर्वात व्यापक व स्पष्ट सर्वेक्षण आहे. व्हिजीबल इन्फ्रारेड सर्वे टेलिस्कोप फॉर अँस्ट्रोनॉमी (विस्टा) नामक दुर्बिणीच्या आकडेवारीतून 9 गीगा पिक्सलची ही छायाचित्रे प्राप्त झाली आहेत. ही छायाचित्रे एवढी मोठी आहे की, मोजमाप घेऊन ती छापली तर त्यांची रुंदी 23 फूट आणि लांबी 30 फूट भरेल. झगमगणार्‍या तार्‍यांची ही फौज आकाशगंगेच्या मध्यावर आहे. सामान्यत: आकाशगंगेतूनच तिची निर्मिती व उगमाची कहानी समजली जाऊ शकते. जुन्या आकाशगंगाच्या मध्यभागाची विस्तृत माहिती प्राप्त करून सर्वात प्राचीन तार्‍यांची माहिती मिळविली जाऊ शकते. अर्थात या भागातील तारे चमकदार असूनही त्यांच्या धूलकण कमी असतात. त्यामुळे तार्‍यांची प्रतिमा स्पष्ट मिळू शकते. विस्टा दुर्बिणीनेही हजारो धुसर प्रतिमा स्पष्ट करून 10,80,200 बाय 81,500 पिक्सलचा रंगीत मोजेक तयार केला. आतापर्यंत कोणतेह अंतराळ छायाचित्र एवढे विस्तृत आणि विशाल रुपात प्राप्त केले जाऊ शकले नव्हते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. अंतराळ शास्त्रज्ञांनी नऊ अब्ज पिक्सलच्या या छायाचित्रात 17 कोटी 30 लाख वस्तूंचा शोध घेतला आहे. या खगोलीय पिंडांमध्ये 8 कोटी 40 तारे असल्याची पुष्टी झाली आहे. सध्या या प्रत्येक तार्‍याची चमक व रंगांचे शास्त्रज्ञ अध्ययन करत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS