लंडन : सतत नवे तंत्रज्ञानाची भर घेऊन बाजारात दाखल होत असलेल्या मोबाइल फोनसाठी शास्त्रज्ञांनी आता एक नवे जनरेशन नेक्स्ट सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमचा मोबाइल हाताने नव्हे तर केवळ नजरेच्या इशार्याने नियंत्रित केला जाऊ शकेल. द आय ट्रॅप असे नाव देण्यात आलेल्या या सॉफ्टवेअरचा निर्माता सन अल्सट्रप जॉन्सन सांगतो की, या तंत्रज्ञानामुळे आपण मोबाइलवरील मूलभूत क्रिया केवळ आपली डोळे फिरवूनच करू शकतो. म्हणजे एखादे ई-बुकचे पेज पालटण्यासाठी आणि डोळ्यांच्या इशार्याने गेमही खेळू शकतो. डॅनिश कंपनीने या सॉफ्टवेअरमध्ये इन्फ्रारेड लाइटचा वापर केला आहे. हा प्रकाश डोळ्यांच्या बुबुळावर आदळून संचलित होते. त्यातून उपकरणाचा कॅमेरा रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर डोळ्यांच्या इशार्याने पेज पालटण्यापासून कॅमेरा क्लिक करण्यापर्यंतच्या क्रिया केल्या जाऊ शकतात. मोबाइलच्या स्क्रिनच्या ज्या भागात आपण एकटक पाहून बुबुळ फिरवू त्या बाजूचे पेज पालटले जाईल. तब्बल आठ लाख डॉलर खर्ची घालून हे अफलातून तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
Post Top Ad
29 October 2012
Home
Unlabelled
आता डोळ्याच्या इशार्याने होईल मोबाइल नियंत्रित
आता डोळ्याच्या इशार्याने होईल मोबाइल नियंत्रित
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment