मुंबई- वरिष्ठ पोलिस अधिकारी के. एल. बिष्णोई यांच्या गैरकृत्यांची पाठराखण केल्याचा आरोप असणा-या राकेश मारिया यांच्यासह चार आयपीएस अधिका-यांना पोलिस महासंचालकांनी क्लीन चिट दिली आहे, तर उर्वरित दोघांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्याचे पोलिस महासंचालक के. सुब्रम्हण्यम यांना दिले होते. त्यानुसार सुब्रम्हण्यम यांनी जुलै महिन्यात हा अहवाल न्यायालयाला सादर केला. त्यात मारिया यांच्यासह नवल बजाज, विश्वास नांगरे-पाटील, संजय सक्सेना आणि पंकज गुप्ता या अधिका-यांविरोधात साळुंखे यांच्या आरोपांत तथ्य नसल्याचे सुब्रम्हण्यम यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.
परंतु, तत्कालीन पोलिस अधीक्षक मोहन राठोड व पोलिस उपायुक्त ब्रजेश सिंग यांच्यावर मात्र कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका सुब्रम्हण्यम यांनी ठेवला आहे. साळुंखे प्रकरणात सरकारी वकिलांनी दिलेल्या परस्परविरोधी मतांमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी राठोड यांनी पुढाकार घेतला नाही. यासंदर्भात नवल बजाज यांनी पाठवलेल्या अहवालाचे स्वत: अवलोकन न करता केवळ पोस्ट ऑफिसप्रमाणे तो राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे सुपूर्द करण्याचे काम राठोड यांनी केले, अशा शब्दांत सुब्रम्हण्यम यांनी त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.
ब्रिजेश सिंग यांनी साळुंखे यांना चुकीची माहिती दिली. पण, त्यांनी हा प्रकार गैरहेतूने केला नसला, तरी या प्रकरणाकडे त्यांनी बेफिकीरीने पाहिले, असे सुब्रम्हण्यम यांनी म्हंटले आहे. सरकारने या दोघांनाही समज द्यावी, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी बिष्णोई यांनी एलएलबीच्या अंतिम वर्षाच्या प्रॅक्टिकलला उपस्थित न राहताच उत्तीर्ण होण्याचा पराक्रम केल्याचा आरोप साळुंखे यांनी केला होता. यात सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आय. ए. इनामदार यांनी त्यांना मदत केली होती. या प्रकरणी आपण पोलिसांत तक्रार दाखल केली होती, पण, बिष्णोई वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे इतर अधिका-यांनी त्यांचा बचाव करण्याचे काम केले, असा आरोप करत महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या चित्रा साळुंखे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

No comments:
Post a Comment