आझाद मैदानात कलावंत महासंघाचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2012

आझाद मैदानात कलावंत महासंघाचे आंदोलन

मुंबई : शाहीर, कवी, कव्वाल, गोंधळी, सिनेकलावंत, गायक आदी कलावंतांनी जनजागृती करत एक क्रांतीच केली आहे, मात्र हे कलावंत आज पेन्शन, आरोग्याचा प्रश्न, उदरनिर्वाहाचा प्रश्न आदी मागण्या घेऊन सरकारशी लढा देत आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागत आहे, असे भारतीय कलावंत महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब (जगन्नाथ अरुण) यांनी सोमवारी आझाद मैदानात कलावंतांच्या आंदोलनावेळी स्पष्ट केले.

या वेळी बोलताना बाळासाहेब म्हणाले, कलावंतांचे मानधन, रेल्वे, एसटी प्रवास, औषधोपचार, कलावंतांच्या मुलांच्या नोकरी-व्यवसायाचा प्रश्न, घरांचा प्रश्न, विमा, मराठी चित्रपटाच्या सवलतीबाबत शासनाने घ्यावयाची भूमिका आदी प्रश्न पल्रंबित असताना शासन याबाबत गांर्भीयाने लक्ष देत नाही.

कलावंत भवनाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत आहे. याबाबत योग्य ती भूमिका शासन घेत नाही, असे बाळासाहेब यांनी सांगितले. या वेळी राज्यभरातून आलेल्या कलावंतांनी आपली कला सादर केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS