पालिका मालमत्ता करदात्यांसाठी शिव आरोग्य सुरक्षा कवच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2012

पालिका मालमत्ता करदात्यांसाठी शिव आरोग्य सुरक्षा कवच


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील करदात्यांच्या आरोग्यासाठी जबाबदारी उचलत 'शिव आरोग्य सुरक्षा कवच' पुरविण्याचे निश्चित केले असून, या योजनेद्वारे प्रत्येक करदात्या कुटुंबासाठी वर्षाला दोन ते अडीच लाख रुपयांची सवलत पालिकेकडून देण्यात येणार आहे.

'शिव आरोग्य योजना' मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य 3 रुग्णालये, 16 इतर रुग्णालये, 26 शिशू संगोपन संस्था, 163 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 5 विशेष रुग्णालयांबरोबर मुंबईतील इतर महत्त्वाच्या रुग्णालयांत उपचारासाठी राबवण्यात येणार आहे. जे मुंबई महानगरपालिकेचे करदाते आहेत, मात्र या मध्यवर्गीयांना कुठल्याही आरोग्याविषयक विशेष सवलती नसल्याचे त्यांना कर्ज काढून उपचार करावे लागततात. ही कुटुंबे पिवळे किंवा केशरी कार्डधारक नसल्यानेत्यांना इतर सरकारी योजनांचाही लाभ घेणे शक्य होत नाही. याचा विचार करून या मध्यवर्गीय कुटुंबांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS