मातंग समाजाची निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2012

मातंग समाजाची निदर्शने

मुंबई : मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शासन निर्णय झालेल्या मागण्यांचंी अंमलबजावणी झाली पाहिजे. यात इतर 17 मागण्या घेऊन अखिल भारतीय मातंग संघ 'बी' गटाच्या वतीने शनिवारी आझाद मैदानात तीव्र निदर्शने करण्यात आली. मातंग समाजाला निवडणुका आल्या की आश्वासनांचे गाजर दाखवायचे, आश्वासने द्यायची. पुन्हा पाच वर्षे या समाजाकडे पाहायचे नाही. अशा सरकारच्या या कारभाराविषयी या समाजाने आता तीव्र आंदोलन करू न योग्य ती जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे संघाचे संतोष गायकवाड यांनी सांगितले. मातंग समाजाला विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर राज्यपाल व राष्ट्रपती कोटय़ातून प्रतिनिधित्व देण्यात यावे. पुणे येथील संगमवाडी येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या भव्य स्मारकासाठी भूखंड द्यावा व 100 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करावी, असे सुदाम आवाडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS