डेंग्यूला आळा घालण्यासाठी पालिकेच्या यानगृहात धूम्रफवारणी करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2012

डेंग्यूला आळा घालण्यासाठी पालिकेच्या यानगृहात धूम्रफवारणी करण्याची मागणी

मुंबई : मुंबईत या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा डेंग्यूचे प्रमाण अधिक असून त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संपूर्ण मुंबईत डासांना आळा घालण्यासाठी पालिकेने मोठय़ा प्रमाणात मोहीम हाती घेतली असून याद्वारे प्रशासनाने पालिकेमध्ये विविध यानगृहांमध्ये पसरलेली अडगळ, टायर्स हे त्वरित हटवण्यात यावेत आणि परिसर स्वच्छ करावा. तसेच त्या ठिकाणी धूम्रफवारणी करून कीटकनाशके, औषधांची फवारणी करण्यात यावी. डासांच्या उत्पत्तीची आगारे असणार्‍या यानगृहाच्या स्वच्छतेचे काम पालिकेने अग्रक्रमाने हाती घेऊन डेंग्यूची साथ नियंत्रणात आणावी, अशी मागणी मनसे कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली.

मुंबईत डेंग्यूच्या आजारामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या यानगृहामध्ये इतस्तत: पसरलेली अडगळ, सामान, गाडय़ांचे टायर्स यांमध्ये पाणी साचून डेंग्यूच्या डासांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. अनेक यानगृहे डासांची उत्पत्तीची आगरे आहेत. त्यामुळे अशा गलिच्छ वातावरणात डासांची पैदास मोठय़ा प्रमाणात होऊन डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराची साथ पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मुंबईत डासांना आळा घालण्यासाठी पालिकेने मोठय़ा प्रमाणात मोहीम हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे पालिका यानगृहांतही पालिकेने स्वच्छतेचे काम हाती घेऊन धूम्रफवारणी तसेच कीटनाशक फवारणी करावी, अशी मागणी नाईक यांनी के ली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS