जकात कर प्रणाली रद्द करू नये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2012

जकात कर प्रणाली रद्द करू नये

मुंबई : मुंबई मनपाचा आर्थिक स्नेत असलेली जकात करप्रणाली रद्द करू नये, असे आवाहन महापौर सुनील प्रभू यांनी राज्य शासनाला केले आहे. जकात करप्रणाली रद्द केल्यास महापालिकेचा आर्थिक कणा मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरांनी राज्य शासनाकडे ही मागणी केली आहे.

केंद्रीय नियोजन आयोगाच्या वित्तीय सुधारणांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात जकात करप्रणाली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या नगरविकास विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास येत्या 1 डिसेंबरपासून ती लागू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ज्या महानगरपालिकांमध्ये ही नवी करप्रणाली लागू करण्यात आली तेथील मनपाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबई मनपात ही करप्रणाली लागू करून महापालिकेला आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आणण्याचा डाव राज्य सरकार करत असल्याचा आरोप महापौर प्रभू यांनी केला आहे. मुंबई मनपात या नव्या करप्रणालीचा कडाडून विरोध करण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत ती लागू करण्यात येणार नाही, असा इशारा महापौर प्रभू यांनी राज्य शासनास प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS