मुंबई : घाटकोपर पूर्वच्या भुयारी मार्ग बसस्टॉपजवळ सोमवारी सकाळी मृतदेह आढळला असून मनपाचा कर्मचारी असलेल्या इसमाची भोसकून व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. जागेच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत असून पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी दोघाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर या ठिकाणी पंढरीनाथ राजाराम मोरे (43) आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असलेले मोरे सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह पूर्व द्रुतगती महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाच्या आडोशाला पोलिसांना मिळून आला. पंढरीनाथ मोरे यांच्या शरीरावर चॉपरने वार केल्याच्या आठ ते नऊ खुणा आढळल्या असून त्यांचे डोके दगडाने ठेचलेले होते. पंढरीनाथ यांचा काही महिन्यांपासून कामराज नगर येथील जागेच्या वाद सुरू होता. या वादातून त्याच परिसरात राहणार्या दोन इसमांनी त्यांची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी दोन संशयित इसमांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
Post Top Ad
02 October 2012
Home
Unlabelled
मनपा कर्मचार्याची घाटकोपरमध्ये हत्या
मनपा कर्मचार्याची घाटकोपरमध्ये हत्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment