गॅस वितरकांच्या लाक्षणिक संपाने ग्राहक त्रस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2012

गॅस वितरकांच्या लाक्षणिक संपाने ग्राहक त्रस्त



मुंबई : सबसिडीच्या गॅस सिलिंडरच्या हिशोबावरून नाखूष झालेल्या गॅस वितरकांनी पुकारलेल्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपाचा ग्राहकांना नाहक त्रास भोगावा लागला. सर्व सिलिंडर एकाच दराने देण्यात यावेत, अशी मागणी वितरक संघटनेने केली आहे. या मागणीसाठी वितरकांनी सोमवारी एक दिवसाचा संप पुकारत घरपोच सिलिंडर दिले नाहीत.
    एका वर्षात केवळ सहा सिलिंडर सबसिडीच्या दराने देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला होता. त्यास जनता आणि विरोधी पक्षाकडून होत असलेला विरोध पाहता सातवा सिलिंडर सबसिडीच्या दरात देण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र सातव्या सिलिंडरवरील सबसिडीचा चोख हिशोब ठेवण्याची जबाबदारी वितरकांवर टाकण्यात आली आहे. यामुळे वितरकांत संभ्रम आहे. असे करण्यापेक्षा सर्व सिलिंडर समान दराने देण्यात यावेत, अशी मागणी वितरकांनी केली आहे. या मागणीसाठी वितरकांनी सोमवारी लाक्षणिक संप पुकारत सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS