पालिकेत सहाय्यक आयुक्तपदी 4 नवे चेहरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2012

पालिकेत सहाय्यक आयुक्तपदी 4 नवे चेहरे


मुंबई : मुंबई महानगरपालिकेत सोमवारपासून चार नवे सहाय्यक आयुक्त रुजू झाले आहेत. एस विभागात प्रशांत गायकवाड, आर-दक्षिण विभागात विश्वास मोटे, आर-उत्तर विभागात संतोषकुमार धौडे आणि जी-दक्षिण विभागात केशव उगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई मनपाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 10 सहाय्यक आयुक्तांपैकी 4 जणांना सेवेत सामावून घेतले आहे. या जणांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, सी विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांची टी विभागात बदली करताना तेथील सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाले यांची सी विभागात बदली करण्यात आली आहे. याशिवाय आर-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांची ई विभागात बदली करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS