इंदू मिल आंदोलनाकडे शिवसेनेची पाठ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2012

इंदू मिल आंदोलनाकडे शिवसेनेची पाठ

P1040534.JPGP1040546.JPGP1040542.JPGP1040536.JPG
शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या वतीनं मुंबईतल्या चेंबूर येथील पांजरपोळ नाक्यावर आंदोलन करण्यात येतं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते या आंदोलनाला अनुपस्थित होते.
इंदू मिलच्या जागेसाठी आंदोलन करणारे भाजप नेते विनोद तावडे आणि रिपाई नेते रामदास आठवले यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं तसंच इंदूमिलची जागा स्मारकासाठी मिळावी यासाठी हे आंदोलन सुरू होतं.
यावेळी बोलताना विनोद तावडे यांनी भाजप इंदू मिल आंदोलनात संपूर्ण ताकदीनिशी उतरेल. इंदू मिलची जागा स्मारकाला मिळणार आहे म्हणून सीआरझेड व इतर कायदे लावले जात आहेत. मग हीच जागा इंडिया बुल्स ला दिली जाणार होती तेव्हा कायदे आडवे येणार नव्हते का अस प्रश्न तावडे यांनी उपस्थित केला. आता जर कोणी स्मारकाला जमीन मिळण्यापासून  रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याला समुद्रात बुडवण्याचा इशारा तावडे यांनी दिला. अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यात राजीनामा दिला असला तरी त्यांनी हा राजीनामा इंदू मिल ची जमिन राष्ट्रीय स्मारकासाठी मिळत नाही म्हणून दिला असता तर लोकांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतले असते टोला लगावला.
रामदास आठवले यावेळी बोलताना सरकार गेले एक वर्ष जमीन स्मारकाला देण्याबाबत चालढकल करत आहे .म्हणून आंदोलन करावे लागते. प्रधान मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असती तर एका आठवड्यात हा प्रश्न सुटला असता असे आठवले यांनी सांगितले.
यावेळी आरपीआय भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जेलभरो केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS