शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव ग्रेड पे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2012

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव ग्रेड पे


मुंबई - मुंबई विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हकीम समितीने शिफारस केलेला वाढीव ग्रेड पे त्वरित सुरू करण्यात यावा, असे आदेश राज्याचे शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी दिले आहेत. 

राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणारा ग्रेड पे मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन निश्‍चितीअभावी मिळत नव्हता. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा केल्यानंतर शिक्षण संचालकांनी वरील आदेश दिले आहेत. या कार्यवाहीची माहिती देणारे पत्र त्यांनी आमदार कपिल पाटील यांना दिले आहे. याचा लाभ सुमारे 15 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS