अग्निशमन जवानांचे प्रशिक्षण नियम स्पष्ट करावे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2012

अग्निशमन जवानांचे प्रशिक्षण नियम स्पष्ट करावे


झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांचा मृत्यू ऑनडय़ूटी झाला नसल्याचे सांगत पालिका प्रशासनाने त्यांच्या कुटुंबीयांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे अग्निशमन जवानांमध्ये नाराजी असून याबाबत नियमांची स्पष्टता होत नाही तोपर्यंत सर्व प्रकारचे डय़ुटीव्यतिरिक्त प्रशिक्षण कवायती तहकूब कराव्यात, अशी मागणी मुंबई अग्निशमन लढावू कामगार संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक तसेच सरचिटणीस माजी महापौर नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

प्रशिक्षण काळ हा ऑनडय़ुटी होत नसल्याचे कारण सांगत पालिका प्रशासनाने सर्जेराव शेणवी यांच्या कुटुंबीयांना ऑन डय़ुटीवर असताना मृत्यू झाल्यास मिळणारे फायदे नाकारले होते. त्यामुळे प्रशिक्षण काळ तसेच कवायती याबाबत प्रशासनाने स्पष्टता करावी. या संदर्भात स्पष्टोक्ती होत नाही तोपर्यंत आगामी काळात होणारे पदोन्नतीचे प्रशिक्षण वर्ग, मॉक ड्रील करू नयेत, अशी सूचना या संघटनेने केली आहे.शेणवी यांच्या मृत्यूनंतर चिडलेल्या अग्निशमन जवानांना संघटनेमार्फत न्याय मिळवून देऊ असे सांगितल्यानंतर जमाव शांत झाला होता. त्यामुळे या संदर्भात आयुक्तांनी मीटिंग घ्यावी, अशी विनंतीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS