‘पीपल्स’चा वाद सर्वोच्च न्यायालयात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2012

‘पीपल्स’चा वाद सर्वोच्च न्यायालयात


मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वाद मतलबी नेत्यांमुळे सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.  

रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले आणि भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात संस्थेच्या अध्यक्षपदावरून अनेक वर्षांपासून संघर्ष आहे.  डॉ. डी. जे. गांगुर्डे आणि डॉ. गंगाधर पानतावणे या दोघांच्या नियुक्तीला  आंबेडकर गटाच्या एम. एस. मोरे आणि एस. पी. गायकवाड या  संचालकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर धर्मादाय आयुक्तांनी मे महिन्यात गांगुर्डे, पानतावणे यांचे संचालकपद रद्द ठरवले. त्यानंतर सत्र न्यायालयानेही धर्मादाय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत गांगुर्डे आणि पानतावणे यांना संस्थेच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्यास मनाई केली .   


उच्च न्यायालयाने मात्र सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एम. एस. मोरे आणि एस. पी. गायकवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आली. खालच्या कोर्टांनी बोगस ठरवलेल्या कागदपत्रांच्या आधारे उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS