बुलेट ट्रेनसाठी स्पेनसोबत करार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बुलेट ट्रेनसाठी स्पेनसोबत करार

Share This

भारतीय रेल्वेने शुक्रवारी स्पेनसोबत एक सामंजस्य करार केला. या करारानुसार दोन्ही पक्षांमध्ये बुलेट ट्रेनविषयी सहकार्य आणि माहिती तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करण्यात येणार आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या रुळांवरच गाडय़ांचा वेग आणि सुरक्षितता वाढवण्यात सहकार्य करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सी. पी. जोशी आणि स्पेनच्या सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक मंत्री अँना पॅस्टर ज्युलिअन यांनी या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करणे हे या करारामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. अलीकडेच रेल्वेने देशात ताशी 300 कि.मी. वेगाच्या बुलेट ट्रेन सुरू करण्याची आणि सात हायस्पीड कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages