केंद्र सरकारने अनुदानित गॅस सिलिंडरचा वार्षिक पुरवठा सहा सिलिंडरपर्यंत मर्यादित केल्यानंतर एकाच घरातील दोन कनेक्शन असणार्या ग्राहकांकडे मोर्चा वळवला आहे. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील तब्बल पावणेपाच लाख ग्राहकांची डबल कनेक्शन रद्द करण्यात आली आहेत.
एकाच कुटुंबाने दोन कंपन्यांकडून सवलतीच्या दरातील सिलिंडर उकळू नये यासाठी सरकाने ग्राहकांची ओळख पटवणारे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच गॅसपुरवठा करण्यासाठी असा अर्ज भरून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात दीड कोटींपेक्षा अधिक गॅस कनेक्शन आहेत. त्यापैकी एकापेक्षा अधिक असलेली 4,76,829 कनेक्शन उघडकीस आल्यानंतर रद्द करण्यात आली आहेत. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, आणि इंडियन ऑईल या तीन एलपीजी सिलिंडर पुरवठादार कंपन्यांतर्फे ग्राहकांची ओळख पटवण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. एकापेक्षा अधिक सिलिंडर असलेल्या सर्व ग्राहकांना 31 ऑक्टोबरपर्यंत ओळख अर्ज भरून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कागदपत्रे जमा न करणार्या ग्राहकांना सवलतीच्या व्यतिरिक्त मिळणार्या सिलिंडरपेक्षाही अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. काही ठिकाणी ओळख अर्ज न भरलेल्या ग्राहकांकडून एका सिलिंडरसाठी 1100 रुपये आकारल्याचेही उघडकीस आले आहे.
Post Top Ad
28 October 2012
Home
Unlabelled
पावणेपाच लाख गॅस कनेक्शन रद्द
पावणेपाच लाख गॅस कनेक्शन रद्द
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.


No comments:
Post a Comment