'कलर्स'ने आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलन - आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'कलर्स'ने आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलन - आठवले

Share This

मुंबई : व्यंगचित्रकार असिम त्रिवेदी याला 'बिग बॉस'च्या कार्यक्रमातून बाहेर काढण्याचे आश्वासन कलर्स वाहिनीच्या प्रशासनाने रिपाइंला दिले आहे. आश्वासनाप्रमाणे जर कलर्स वाहिनी वागली नाही तर रिपाइंला तीव्र आंदोलन करून असिम त्रिवेदीला बाहेर काढावे लागेल, असा इशारा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. 29 ऑक्टोबरला पुकारलेल्या 'लोणावळा बंद'च्या रिपाइंच्या इशार्‍याला घारबत कलर्स वाहिनीने असिम त्रिवेदीबद्दल आम्ही त्वरित निर्णय घेऊन त्याला बाहेर काढण्याची व्यवस्था करू. बिग बॉसचे निर्मिती व्यवस्थापक अभिषेक रेगे व कलर्सचे रोमील रामगरिया यांनी असिम त्रिवेदीच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोणावळा बंद आंदोलन स्थगित केले आहे.

व्यंगचित्रांद्वारे देशाचा अपमान करणार्‍या असिम त्रिवेदीचा गुन्हा देशद्रोहापेक्षा मोठा आहे, असे आठवले यांनी या वेळी सांगितले. भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर आरोप करणार्‍यांना सध्या काही काम नाही. त्यामुळे आरोप करण्याचे काम ते करत आहेत. बिनबुडाचे आरोप करून काही होत नसते, मात्र चौकशी झाली पाहिजे, असे आठवले यांनी गडकरींच्या भ्रष्टाचाराबाबत मत स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages