मुंबई - स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या थोर व्यक्ती यांच्या पुतळ्यांना नवी झळाळी देण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. त्यासाठी दर तीन महिन्यांनी तज्ज्ञांमार्फत या पुतळ्यांची साफसफाई करून परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय आज महापौर दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबईतील पुरातन कारंजाची यात डागडुजी करण्यात येणार असून फ्लोरा फाऊंटनच्या डागडुजीचे सादरीकरण महापौर सुनील प्रभू यांच्या दालनात करण्यात आले. या वेळी फक्त कारंजांचे नव्हे; तर शहरातील थोरांच्या पुतळ्यांचेही सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. याची प्रशासनानेही दखल घेतली असल्याने या पुतळ्यांना आता लवकरच लकाकी येणार आहे.
मुंबईत सध्या 125 पुतळे असून, त्यांची तीन वर्षांपूर्वी सफाई झाली होती. तेव्हापासून केवळ जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशीच वरवरची सफाई केली जाते.


No comments:
Post a Comment