बेस्ट इज नॉट 'बेस्ट' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2012

बेस्ट इज नॉट 'बेस्ट'

मुंबई : बेस्टच्या बसेसची काही महिन्यांपासूनची वाटचाल पाहिली तर लक्षात येते की, अपघातांचे प्रमाण किती आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांनंतर जनमानसात बेस्ट उपक्रमाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेस्ट प्रशासन बसचालकांवर योग्य ती कारवाई करत नसल्याचे बोलले जाते; परंतु त्यामुळे बेस्ट प्रशासनाकडून मात्र 2011-12 मध्ये अपघातांचे प्रमाण कमी असल्याचे आणि चालकांवर वेळोवेळी योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

बेस्ट प्रशासनाकडून चालकांना सुरक्षित प्रवासाविषयी नेहमी सांगितले जाते. तरीही कामात निष्काळजीपणा करणार्‍या चालकांविरुद्ध उपक्रमाच्या सेवाविनियमाला अनुसरून खातेनिहाय चौकशी केली जाते. या चौकशीअंतर्गत गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेऊन कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येते. 2011 मध्ये 4870 चालकांवर कारवाई करण्यात आल्याचे बेस्टने म्हटले आहे. चालकांना त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेऊन सक्त ताकीद ते सेवेतून बडतर्फ करणे अशा वेगवेगळय़ा प्रकारच्या शिक्षा देण्यात आलेल्या आहेत. काही चालकांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून काहींची वेतनश्रेणी कपात तर काहींची वेतनश्रेणी स्थगित अशा शिक्षा देण्यात आल्या आहेत. बेस्ट प्रशासनाने 2011 मध्ये प्रतिमहिना 400 चालकांवर वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. तसेच प्रतिमहिना 20 बसचालकांवर बेदरकारपणे बस चालवल्याबद्दल कारवाई करण्यात केलेली आहे. 2010-11 मध्ये बेस्टतर्फे देण्यात आलेली नुसकानभरपाई 3 कोटींच्या घरात होती अणि 217 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली होती, तर 2011-12 मध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS