गडकरींनी अध्यक्षपद सोडावे - जेठमलानी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2012

गडकरींनी अध्यक्षपद सोडावे - जेठमलानी

नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे, असा सल्ला देऊन मोकळे झालेले पक्षाचे राज्यसभा खासदार व ख्यातनाम विधीज्ञ राम जेठमलानी यांनी मंगळवारी येथे पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी पद सोडावे, अशी सूचना केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जावे लागत असलेले गडकरी यांनी पक्षाध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाल न स्वीकारता ते सोडून द्यावे, असे जेठमलानी म्हणाले. पक्षाचे व स्वत:चे हित विचारात घेऊन त्यांनी हा राजकीय सुज्ञपणा दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले.

ज्याच्यावर अधिकाधिक लोक ांचा विश्वास आहे, अशा व्यक्तीलाच भाजपाचे अध्यक्षपद दिले जावे, असा प्रस्तावही जेठमलानी यांनी ठेवला. गडकरी यांनी दुसर्‍या कार्यकालाची अभिलाषा धरू नये, असेही त्यांनी नमूद केले. गडकरी पक्षाध्यक्षपदी कायम राहिल्यास भाजपाची स्थिती कमजोर होईल, असा दावा करण्यासही ते विसरले नाहीत. आगामी निवडणुकांमध्ये भाजपा भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरणार आहे. अशा स्थितीत निष्कलंक प्रतिमा असलेल्या व्यक्तीची पक्षाच्या अध्यक्षपदी अत्याधिक आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जेठमलानी यांनी राजकारणाचा धंदा केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक् त केली. दरम्यान, गडकरी व भाजपा यांच्याबद्दल बोलताना गडकरी हेच अध्यक्षपदासाठी योग्य असल्याचा दावा पोलादमंत्री बेनी प्रसाद वर्मा यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS