| कानपूर : पायाने अपंग व्यक्तीसाठी व्हीलचेअर मोठा आधार ठरतो. व्हीलचेअरच्या मदतीने त्याचे हिंडणे-फिरणे थोडे फार सुकर होते. असे असले तरी पायर्या चढून जाण्यासाठी त्याला इतरांचाच आधार घ्यावा लागतो. मात्र आता ही समस्यासुद्धा लवकरच दूर होणार आहे. अपंग व्यक्ती आता व्हीलचेअरवर बसूनच पायर्या चढून जाऊ शकेल. उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद शहरातील सोनू शर्मा नामक तरुणीने अशी एक अनोखी व्हीलचेअर तयार केली असून तिच्यावर बसून कोणतीही अपंग व्यक्ती अगदी सहजपणे पायर्या चढून वर जाऊ शकते. केवळ चढणेच नाही उतरूही शकेल. सोनूने कानपूर आयआयटीतून पीएचडीची पदवी प्राप्त केलेली असून तिथेच तिने ही व्हीलचेअर तयार केली असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. अपंगांसाठी वरदान ठरणारी व त्याचे जगणे आणखी सुलभ करणारी ही व्हीलचेअर लवकरच बाजारात उतरविली जाणार आहे. सोनू सध्या फिनलँडमध्ये एका प्रोजेक्टवर काम करत असल्याने ती भारतात येऊ शकत नाही. त्यामुळे हा सन्मान घेण्याचे भाग्य तिला मिळाले नाही. बाजारात या व्हीलचेअरची किंमत पाच ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान असेल. या व्हीलचेअरमुळे अपंगांची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकेल आणि ते वरच्या मजल्यावर चढून आपल्या नातलगांची भेट घेऊ शकतील तसेच कार्यालये आणि रेल्वेस्थानकांवरही चढून जाऊ शकतील. अशा अनेक ठिकाणी लिफ्टची सोय नसल्याने अपंग लोकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागते. ही व्हीलचेअर त्यांच्यासाठी मोठी दिला ठरणार आहे. आपल्या मुलीच्या संशोधनावर तिचे पालक अतिशय खूश आहेत. |
Post Top Ad
01 November 2012
Home
Unlabelled
व्हीलचेअर आता पायर्याही चढून जाईल
व्हीलचेअर आता पायर्याही चढून जाईल
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.


No comments:
Post a Comment