अनुमानापेक्षा बराच काळ होते डायनासोरचे अस्तित्व - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2012

अनुमानापेक्षा बराच काळ होते डायनासोरचे अस्तित्व

लंडन : पृथ्वीवरील सर्वात विशालकाय प्राणी डायनासोरवर सातत्याने संशोधन सुरू असले तरी या प्राण्याविषयी पूर्णत: जाणून घेणे अजूनही शक्य झालेले नाही. जीवशास्त्रज्ञ व इतिहासाकारांसाठी रहस्य ठरलेल्या डायनासोरबाबत सतत नवनवीन माहिती उजेडात येत आहे. साडेसहा कोटी वर्षापूर्वी प्रचंड उल्कापाताच्या आघाताने डायनासोरचे पृथ्वीवरील अस्तित्व संपुष्टात आणले होते असे आजवर मानले जात होते, पण एका ताज्या संशोधनातून या अंदाजाला छेद दिला आहे. डायनासोर साडेसहा कोटी वर्षापूर्वी नष्ट झाले नव्हते तर त्यानंतर बराच काळ म्हणजे 90 लाख वर्षापूर्वीही ते अस्तित्वात होते, असे त्यात दिसून आले. पोलंडमध्ये आढळून आलेल्या डायनासोरच्या पायांच्या ठशांच्या अध्ययनातून हा खुलासा झाला आहे. 90 लाख वर्षापूर्वीच्या भूगर्भिक युगात भले त्यांचा आकार तुलनेने छोटा होता, पण पृथ्वीवर त्यांचे अस्तित्व होते. पायांच्या सापडलेल्या ठशांतून 25 कोटी वर्षापासून या प्राण्याचा पृथ्वीवर वावर असावा, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS