झोपडीतल्या गरिबांना घर काही मिळेना
मुंबई / रशीद इनामदार
मुंबईतील झोपडपट्ट्या हटवून त्यांना हक्काच्या चांगल्या घरात राहायला मिळाव . झोपडपट्ट्या कडे नेहमी च गुन्हेगारी ,रोगराई यांचे मा हेरघर म्हणून पाहिलं जातं . झो पडपट्ट्यांच्या जागी स्वच्छा सुंदर वसाहती निर्माण व्हाव्यात या सरकारच्या स्वागतार्ह निर्णयानंतर बर्याच ठिकाणी कामाला सुरुवात झाली परंतु त्या अजूनतरी बर्याच ठिकाणी त्या पूर्णत्वास येतील अशी खात्री बाळगता येत नाही .
चेंबूर, गोवंडी ,घाटकोपर मानखुर्द या झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात असलेल्या मुंबई च्या पूर्वेकडील उपनगरांमध्ये हा विषय कायम चर्चेत असतो. एस आर ए सारखी स्तुत्य आणि सगळ्यांच्या फायद्याची योजना पण काही स्वार्थी लोकांमुळे अडकून पडली आहे. एकाच झोपडपट्टी मध्ये बर्याच विकासकांना आपला आर्थिक फायदा दिसू लागल्यामुळे .काही प्रतिष्टीत लोकांना , झोपडी दादांना स्थानिक पुढार्यांना योग्य ते आर्थिक लाभ देऊन तसेच वसाहतीमध्ये घर मिळेल असे आमिष देऊन आपल्या गोटात सामील करून घेण्यसाठी धडपड होऊ लागली . त्यामुळे रहिवाश्यांमध्ये एकमेकांच्या सुखदुखात सामील होण्याची मनस्थिती नाहीशी होऊन .दुफळी निर्माण होण्यास वातावरण निर्माण होऊ लागले . छोट्याश्या भूखंडाची किंमत शहरी भागात गगनाला भिडणारी असते त्यातून मिळणार्या मोठ्या कमाईसाठी मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात होऊ लागले. त्यातून संघर्ष निर्माण झाले . काहींना प्राणाला मुकावे लागले तर काही जायबंदी झाले . परंतु विकासकामधला वाद काही आजवर संपलेला नाही. गरिबांना हक्काचे घर आज हि स्वप्नातीत वा टत आहे.
एस आर ए च्या माध्यमातून विकासक आणि त्यांचे पाठीराखे उपक्रम राबू हि देत नाही. उलटपक्षी म्हाडा हि सरकारी यंत्रणा नियमांनुसार घर देईल अशी आशा असताना देखील म्हडाबद्दल अपप् रचार करत असतात. म्हाडा चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असेल ,म्हाडा ने कामास सुरुवात केली तर आपल्याला विस्थापित व्हावे लागेल, आपल्याला इमारतीत घर मिळायला किती वर्ष लागतील अशी भीती झोपडपट्ट्या तून राहणाऱ्या गरीब नागरिकांच्या मनात पसरवून आपल्या कडे वळवून आपल्याला जास्त पाठींबा मिळावा असे प्रयत्न करत असतात .रीतसर कामाला सुरुवात अजून हि झालेली दिसत नाही . या उपक्रमाच्या आडून बर्याच मोठ्या प्रमाणात अर्थकारण आणि राजकीय स्वार्थ वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.
घाटकोपर ते मानखुर्द परिसरातील झोपडपट्ट्या मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या नियोजित मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पामुळे आणखी संभ्रमाची स्थिती आणि नागरिकांना घाबरविण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. मेट्रो रेल्वेच्या अखेरच्या टप्प्यात घाटकोपर ते मानखुर्द असा मार्ग आणि मानखुर्द येथे डेपो असा प्रस्ताव असल्याचे या विकासकाकडून आणि त्यांच्या दलालाकडून बोलले जाते . त्यामुळे लवकरात लवकर झोपडपट्टीचे एस आर ए अंतर्गत काम व्हावे असा अन्यथा मेट्रो रेल्वेच्या कामामुळे आपल्याला विस्थापित व्हावे लागेल व पुन्हा आणखी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल प्रचार ते करत आहेत . प्रत्यक्षात मात्र हातावरचे पोट असलेले झोपडीधारक आणि त्यांचे कुटुंबीय मात्र नियम आपले भवितव्य यांचे खरे खोटे करण्यास असमर्थ ठरत आहेत .
या झोपडपट्टी आणि विकासक यांच्या मध्ये मध्यस्थी करणारे दलाल यांना गरिबांच्या प्रश्नांशी तसेच विकासकाचे काम व्हावे अशी मनस्थिती दिसत नाही. बर्याच ठिकाणी यांनी दलाली खाऊन विकासकांना जनतेसमोर आणले त्यासाठी सभा आयोजित केल्या झोपडी धारकांना मेजवान्या देऊन , पाकिटे देऊन सह्या गोळा केल्या परंतु योजना तडीस जाईल असा विचार केला नाही. आर्थिक नुकसान सहन करून हि विकासक वैतागून निघून जातो . मग दलाल नवीन विकासक पुन्हा आणतात आणि पुन्हा तोच खेळ होतो.दरवेळी वि कासक आणि आशाळभूत नजरेने पाहणारी जनतेची फसवणूक होते. दलाल असलेल्या बर्याच पुढार्यांची घरे हि या झोपडपट्ट्या त नसतात. कोणतेही काम धंदा न करता हि मंडळी आपल्यासाठी एवढा खर्च कसा करतात कुठून एवढा पैसा आणतात असा प्रश्न गरीब झोपडीधारक करू लागले आहेत .
एस आर ए ची योजना गरिबांच्या भल्यासा ठी आहे कि दलालांच्या ?म्हाडा चा अपप्रचार का केला जातो ? आपण राहत असलेली जागा महापालि का , कलेक्टर यापैकी कोणाच्या नियंत्रणात येते ?भाडे कोणाला द्यायचे ? म्हाडा ,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण झोपडपट्ट्या तील ना गरिकांच्या मनातील गैरसमज दूर का करू शकत नाहीत ? आपल्याला इमारतीत राहायला मिळेल कि नाही ? असे बरेच प्रश्न गरीब झोपडीधारकाला पडत असतात परंतु आजतागायत त्यांचा निरसन केले गेले नाही . उलट रहिवाश्यांमध्ये फूट पडून अविश्वास , असंतोष खदखदत असतो .तरी संभंधित प्रशासनांनी यात वेळीच लक्ष घातले पाहिजे असे बर्याच नागरिकांची मागणी आहे.


No comments:
Post a Comment