श्वेतपत्रिका असमाधानकारक असल्यास काळी पत्रिका काढू - जयंत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2012

श्वेतपत्रिका असमाधानकारक असल्यास काळी पत्रिका काढू - जयंत पाटील



मुंबई : जलसंपदा खात्याच्या कारभारावर काढण्यात येणारी श्वेतपत्रिका सर्वसमावेशक व जनतेचे समाधान करणारी असावी; अन्यथा या भ्रष्टाचारात गुंतलेल्या व्यक्तींच्या नावासह आपण काळी पत्रिका काढू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिला.

या श्वेतपत्रिकेत धरणाची लांबी, उंची, प्रकल्पांची प्रारंभिक किंमत, वाढवण्यात आलेली किंमत, कार्यादेशाची तारीख, सुधारित कार्यादेशाची तारीख, कंत्राटदाराचे नाव, तेथून आलेली रक्कम, पाण्याची एकूण क्षमता, शेतीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाण्याची क्षमता, औद्योगिकीकरणासाठी आरक्षित कोटा, लाभार्थीची नावे, विस्थापित होणारी गावे, प्रकल्पग्रस्तांची संख्या, धरणक्षेत्राखाली येणारे क्षेत्र आदी सर्व तपशील आला पाहिजे, असेही ते म्हणाले. या विषयावर श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा होऊन आठ महिने झाले; पण अजूनही श्वेतपत्रिका निघालेली नाही. जलसंपदा खात्याचे माजी मंत्री तसेच विद्यमान मंत्री सुनील तटकरे यांना वाचवण्यासाठी हा विलंब लागला, असा आरोपही त्यांनी केला. या कारभाराची चौकशी होईपर्यंत तटकरे यांनी काढलेल्या कंपन्यांची मालमत्ता आणि बँक खाती गोठवावीत, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. ही श्वेतपत्रिका काढण्यापूर्वी आघाडी सरकारच्या काळातील सिंचनाच्या सर्व प्रकल्पांबाबत कॅगच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत स्पेशल ऑडिट कारवे, अशी माहणीही त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS