मनपाने बेस्टला बिनव्याजी कर्ज द्यावे - लांडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 October 2012

मनपाने बेस्टला बिनव्याजी कर्ज द्यावे - लांडे

मुंबई : बेस्ट ही पालिकेची अंगीकृत संस्था आहे. त्यामुळे बेस्टच्या पडत्या काळात पालिकेने आर्थिक मदत करताना बिनव्याजी कर्ज द्यावे, तसेच महाराष्ट्र शासनानेही बेस्टला टोल माफ करावा, अशी मागणी मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी केली आहे.बेस्ट तोटय़ात जाण्याची प्रमुख कारणे म्हणजे मुंबईतील वाहतूक व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, फेरीवाले यामुळे वाहतुकीमध्ये बराच वेळ जाऊन इंधन वाया जाते. पालिकेने बेस्ट उपक्रमास सहकार्य केले तरच तोटा भरून निघू शकतो. वाहतूक व्यवस्था ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे बेस्टला वर्षाला साडेआठ कोटींचा टोल भरावा लागतो. हा टोल शासनाने माफ केल्यास एकप्रकारे आर्थिक सहाय्य मिळेल. बेस्टकडून मुंबईच्या करदात्यांसाठी शालेय पास योजना, ज्येष्ठ नागरिकांना अर्धी तिकीट योजना, नगरसेवकांना मोफत पास योजना अशा असंख्य सवलतींच्या योजना राबविल्या जातात. या योजनांमुळे नुकसान होत असल्यामुळे पालिका स्वत: यासाठी जबाबदार आहे, असा आरोप लांडे यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS