महापौर, आयुक्तांची सिद्धार्थ रुग्णालयास भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापौर, आयुक्तांची सिद्धार्थ रुग्णालयास भेट

Share This
मुंबई : पश्चिम उपनगरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये वर्गवारी करण्यात येणार्‍या सिद्धार्थ रुग्णालयास महापौर सुनील प्रभू आणि आयुक्त सीताराम कुंटे यांनी भेट देत समस्या जाणून घेतल्या. या वेळी आ. सुभाष देसाई, पी / दक्षिण समितीचे अध्यक्ष राजू पाध्ये, नगरसेविका प्रमिला शिंदे, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर आणि पालिका अधिकारी उपिस्थत होते.सिद्धार्थ रुग्णालयाच्या विस्तारीकरण आणि खाटांची संख्या 300पर्यंत वाढवण्याची मागणी या वेळी आ. सुभाष देसाई यांनी महापौरांकडे केली. यासाठी रुग्णालयाच्या पूर्वेस लागून असलेला भूखंड विकास आराखडय़ात आरक्षित करण्यात आला असल्याचे देसाई यांनी निदर्शनास आणून दिले. या मोकळ्या भूखंडाचा ताबा म्हाडाने आजपर्यंत पालिकेस दिला नाही. मनपा आयुक्त कुंटे यांनी भूखंड ताब्यात घेऊन येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी सूचना या वेळी देसाई यांनी केली. रुग्णालयाच्या इमारतीवर एक मजला चढवून पॅथॅलॉजी, ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी देसाई यांनी या वेळी केली. रुग्णालयात उपाहारगृह सुरू करून महिला बचत गटांना चालवण्यासाठी द्यावे, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कामगार आणि औषध निर्मात्यांची पदे त्वरित भरावीत, अशी सूचना या वेळी महापौरांनी संबंधित अधिकार्‍यांना केली.
     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages