महापालिका शाळांत सोमवारपासून सुगंधी दूध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका शाळांत सोमवारपासून सुगंधी दूध

Share This

मुंबई - १६ दिवसांपासून बंद असलेल्या सुगंधी दुधाचे पालिका शाळेत पुन्हा वितरण होणार आहे. येत्या सोमवारपासून शाळांमध्ये सुगंधी दुधाचे वितरण करण्यात येणार असल्याचे शिक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांनी सांगितले.
         ११ ऑक्टोबर रोजी मालवणी येथील पालिका शाळेतील ११ विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या झाल्या होत्या. त्यानंतर सुगंधी दुधाचा पुरवठा थांबविण्यात आला होता. खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना सुगंधी दूध देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दूध बाधले की खिचडी याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यात सुगंधी दुधात दोष नसल्याचे आढळून आल्याने सुगंधी दूध पुन्हा सुरू करण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतल्याचे खरटमोल यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages