अश्लील एसएमएस पाठवणा-याला कोठडी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2012

अश्लील एसएमएस पाठवणा-याला कोठडी


नवी दिल्ली – कोणत्याही महिलेला अश्लिल एसएमएस अथवा एमएमएस पाठवल्यास तीन वर्षांची सक्त कैद होऊ शकते. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाअंतर्गत, एखादा व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत कैद आणि दंडही होऊ शकतो.
महिलांना अश्लिल मेसेज पाठवल्याबद्दल प्राथमिक स्वरुपात दोषी आढळल्यास २००० रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आणि त्यासोबत तीन वर्षांची कैद होऊ शकते.
तर दुस-यांदा दोषी आढळल्यास सात वर्षांची कैद आणि एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपये भूर्दंड होऊ शकते. फक्त पोलीस अधिका-यालाचं या घटनेची चौकशी करण्याचा अधिकार असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS