रेल्वेतून पडून एक ठार, तीन गंभीर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेतून पडून एक ठार, तीन गंभीर

Share This

मुंबई- मध्य रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वेतून खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर तीन जण ठार झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. सायन- माटुंगा रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली.
 
रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका एक्स्प्रेसमधून चार प्रवाशी खाली पडले. त्यातील एकाच जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेच्या छतावर बसून हे प्रवाशी प्रवास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.  छतावरून खाली घसरल्याने ते रेल्वे रुळावर आपटले गेले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages