मंदिर प्रवेशामुळे दलितांवर बहिष्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मंदिर प्रवेशामुळे दलितांवर बहिष्कार

Share This

मुंबई : शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन राज्य करणार्‍या सरकारच्या राज्यात आजही दलितांवर अन्याय होत आहे. करवीर तालुक्यात कळंब तर्फ कळे या गावात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दलित समाजाचे 2-4 तरुण कलेश्वर महादेव मंदिरात प्रवेश केल्यामुळे सर्वणांनी दलित समाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यांना किराणा दुकानातून मालसुद्धा देण्यात येत नाही. अशा प्रकारे अन्याय करणार्‍यांवर अँट्रोसिटी कायद्याखाली चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक समता मंचचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी केली आहे.

या समाजातील व्यक्तींशी कुणी गावकर्‍यांनी बोलल्यास त्याला 3 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यांना कुणी कामावर ठेवल्यास संबंधीतांना शिक्षा करण्यात येणार आहे, अशी मजल सर्वाची झालीच कशी. पोलीस यंत्रणा व आदी शासकीय अधिकारी काय करत आहेत, असा सवाल कांबळे यांनी केला आहे. कोल्हापूर, गडहिंग्लज, सांगली, सातारा आदी ठिकाणी या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहे. सरकारने या प्रकरणी गांर्भीयाने भूमिका घेत योग्य तो निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages