एटीएम बनणार मिनी बँक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2012

एटीएम बनणार मिनी बँक


हवे तेव्हा पैसे उपलब्ध करून देणारे एटीएम मशीन आता आणखी व्यापक होणार आहे. हे नवे स्मार्ट एटीरोजच्या रोजच्या आयुष्यातील बँकिंग सेवांनाही अतिशय सुलभ बनवतील. हे एटीएम तुमच्या नोटा मोजण्यापासून चेक वाचणे व त्या चेकची रक्कम आपल्या खात्यात जमा करणे तसेच कमी करण्यापर्यंतची कामे करतील. कॉमनवेल्थ बँकेने छोटय़ा बँकेच्या रुपात काम करणारी ही नव्या स्वरुपाची 40 एटीएम सुरू केली आहेत. चालू वित्तवर्षात अशी आणखी 150 एटीएम बसविली जाणार आहेत. या नव्या प्रयोगामुळे एटीएम एवढे सक्षम होतील की, बँकेत रांग लावून आपल्याला करावी लागणारी कामे ते स्वत:च करतील. या स्मार्ट एटीएम मशीनमुळे छोटय़ामोठय़ा कामांसाठी बँकेत चकरा मारण्याचीही गरज उरणार नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS